Availability: In Stock

Khauche Paise

SKU: 9788194272267

Original price was: ₹98.Current price is: ₹85.

Category: Brands:

Description

बालकथा लिहिणं म्हणजे बालकांच्या भावविश्वात जाणं. त्यांच्यातील आचार-विचारांशी एकरूप होणं. हावभाव तथा बोलीभाषेशी नातं जोडणं. खरंतर ह्या बाबी सोप्या नसतात. या सगळ्यांना मनावर बिंबवत सुभाष किन्होळकर लिखित ‘खाऊचे पैसे’ हा बालकथा संग्रह मुलाच्या भावविश्वाशी हवहवसं आपलं नातं जोडतो. यातील प्रत्येक कथा दमदार लेखनीतून उतरल्यामुळे आपलीशी वाटते. त्यातून प्रकटणारी विविधता ही जमेची बाजू होय. कथांची सजग मांडणी, यथार्थ आशय, पात्रांचं चपखल योजन आणि संस्काराचं लेपन यामुळे हा संग्रह अधिक संपन्न झाला आहे. प्रवाहातील सहज अाणि सोपे शब्द, समर्पक संवाद, कथेतील उत्सुकता आणि लेखनलय इत्यादी बाबींमुळे सदर बालकथा संग्रह मनांत रुंजी घालतो. लेखकाने आपला भवताल आणि बाल मनाची वीण मनस्वी गुंफली आहे. त्यामुळे बाल वाचक या संग्रहाचं मनापासून स्वागत करतील, यात जराही शंका नाही.

Additional information

Weight 35 g
Dimensions 210 × 148 × 3 mm
ISBN13

9788194272267

Author

Language

Marathi

Format

Paperback

Trim

5.8×8.3

Pages

30

Publication Year

2019

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.